मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक 127 चे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीने विभागात मोफत कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते

163

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला असून मुंबई हे केंद्र स्थानी आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचा वाढदिवस कार्यकर्त्यानी उत्साहात साजरा न करता केवळ रुग्णांसाठी विविध शिबिरे राबवण्याचे आवाहन केले. घाटकोपर पश्चिम शिवसेना प्रभाग क्रमांक 127 चे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीने विभागात मोफत कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी कोरोना चेकअप , सर्दी , खोकला , ताप व लहान मुलांच्या आजारावर तपासणी करून औषधे देण्यात आले. समर्पण ब्लड बॅंक च्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. डॉ पूजा दैय्या , कोडीनेटर संदीप खरात , लीना निरभवने यांनी रुग्णांची तपासणी करून औषधे दिले.त्यांचा सन्मान सुरेश पाटील यांनी केला. यावेळी शाखाप्रमुख संजय कदम , संजय शेट्टी , शिवाजी जाधव , महेंद्र पगारे आदी उपस्थित होते.