Home गडचिरोली अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक नागरिकासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश व...

अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक नागरिकासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश व बरेच प्रवेशाच्या वाटेवर !

230

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम भागात जनसंपर्क अभियानात मा.उध्दव ठाकरे साहेब शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा गडचिरोली किशोर चंद्रकांत पोतदार साहेब, सहसंपर्क प्रमुख, डॉ.रामकृष्ण मडावी साहेब माजी आमदार, जिल्हा प्रमुख गडचिरोली मा.राजगोपालजी सुल्वावार यांच्या मार्गदर्शनाखाली धडाडीचे तडफदार शिवसेना तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात भामरागड तालुक्यातील, कुमारी बेबीताई सम्मा पोरतेट, हेमालकसा, सौ मनीषा रवींद्र पिपरे, प्रविर विश्वास, भामरागड, मनीषा भांडेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला व सदस्य नोदणी फार्म भरून शिवसेना सदस्यता स्वीकारली. तालुका प्रमुख खुशाल मडावी यांच्या कार्याचे शिवसेना जिल्हा पदाधिकारी यांनी कौतुक केले असून सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम वरिष्ठांच्या आदेशान्वये घेण्यात आला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अहेरी रियाज भाई शेख, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुणजी धुर्वे, अहेरी विधानसभा संघटक बिरजुजी गेडाम, शिवसेना तालुका प्रमुख अहेरी अक्षय करपे, उपतालुका प्रमुख दिलीप सुरपाम, शिवसेना तालुका प्रमुख सिरोंचा दुर्गेश तोकला, शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली किसनजी मठ्ठामी, शिवसेना तालुका प्रमुख मुलचेरा निलकमल मंडल यांच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढवण्याचे काम हाती घेतल्याने अनेक नागरिक व राजकीय नेते शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याने
येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष जिल्ह्यात एक मजबूत पक्ष म्हणून बघण्यात येईल असे स्थानिक लोकांनमध्ये सूर निघत आहे.

Previous articleकन्हान येथे वाढत्या कोरोना रोगावरील प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना विषयी आधिकारी शी गज्जु यादव नी चर्चा केली.
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक 127 चे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीने विभागात मोफत कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते