कन्हान येथे वाढत्या कोरोना रोगावरील प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना विषयी आधिकारी शी गज्जु यादव नी चर्चा केली.

 

क्मलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र):-कन्हान नगरपरिषद येथे श्री उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी कन्हान अंतर्गत पटेलनगर येथील कोरोना प्रभा
वित क्षेत्रात भेट दिली. स्थानिक लोकांशी व्यक्ति बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तदनंतर कन्हान नगरपरिषद येथे श्री बाबू रंगारी उपाध्यक्ष न.प यांच्या कक्षात श्री वरुण सहारे तहसीलदार पारशिवनी, श्री चिदरवार मुख्याधिकारी न.प कन्हान, श्री अमित आत्राम सहायक पुलिस निरीक्षक कन्हान यांचेशी कन्हान येथील वाढत्या कोरोना रोगावरील प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना विषयी चर्चा केली.
यावेळी सोबत श्री बाबू रंगारी उपाध्यक्ष,नगरसेविका रेखाताई टोहने,नगरसेवक मनीष भिवगड़े , प्रशांत वाघमारे,आकिब सिद्दीकी, सतीश भसारकर,अमोल प्रसाद,मेघराज लुंढेरे इत्यादी उपस्थित होते.