Home चंद्रपूर  चिमूरच्या ग्रामीण भागात पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया

चिमूरच्या ग्रामीण भागात पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया

314

 

प्रतिनिधी /शुभम पारखी

चिमूर येथे अवैद्य दारूची विक्रेत्यांवर लागोपाठ झालेल्या कारवाहीमुळे अवैद्य दारू विक्रेत्यांचे मुसके बांधल्या गेल्याने अवैद्य दारू विक्रेते हे ग्रामीण भागाकडे वळू लागले त्यामुळे त्यांचेवर कारवाही करण्यास प्रत्येक बीट पोलीस यांनी विशेष मोहीम राबवित असताना खडसंगी भागात सिल्वर रंगाची शेवरलेत क्र MH40A7673 ही देशी दारूचा एकूण 3,21,200 रु चा माल वाहतूक करताना मिळुन आल्याने आरोपी अक्षय मधुकर लभाने, परमेश्वर जाणबाजी झांबरे दोन्ही रा. वाघेडा यांचेवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आले. तसेच खडसंगी येथिल आरोपी विना राजकुमार चाचरकर , कैलास अंतुजी मेश्राम , बाजसिंग उर्फ मालपाणी अवतारसिंग आंद्रेले रा वाहनगाव यांचे कडे 5200 रु चा देशी दारूचा माल मिळून आल्याने त्यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसऱ्या कारवाहित मौजा पिपर्दा येथे आरोपी प्रफुल प्रकाश धडांजे यांचे राहते घरी 45000 रु ची मोहदारू व पळस गाव येथील आरोपी सुमित हरिदास भीमटे याचे जवळ 1600 रुची देशी दारू मिळून आल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाही उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर श्री अनुज तारे साहेब , पोहवा विलास सोनूले, नापोशी किशोर बोढे , दिनेश सूर्यवंशी, पोशी सतीश झिलपे, सचिन गजभिये, विशाल वाढई, विजय उपरे, महिला पोलीस शिपाई मयुरी कोराम यांनी पार पाडली.

Previous articleअनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाचा खून करणारी माता जेरबंद घनसावंगी पोलिसांनी तपासाची च्रके वेगाने फिरऊन १२ तासात लावला छडा
Next articleकन्हान येथे वाढत्या कोरोना रोगावरील प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना विषयी आधिकारी शी गज्जु यादव नी चर्चा केली.