अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाचा खून करणारी माता जेरबंद घनसावंगी पोलिसांनी तपासाची च्रके वेगाने फिरऊन १२ तासात लावला छडा

178

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एक दिवसाच्या बालकाला नदीच्या पात्रात फेकून जीवे मारणाऱ्या मातेचा अवघ्या १२ तासात शोध लावण्यात घनसावंगी पोलिसांना यश आले आहे. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य एका आरोपीच्या शोधात पोलीस आहेत.
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु.!! येथील नरुळा नदीच्या पात्रातील डोहात शुक्रवार (२४)रोजी कपड्यात गुंडाळलेले एक नवजात अर्भक तरंगतांना ग्रामस्थांना आढळले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला होता. या नवजाताचा अर्भकाचा साडीने गळा आवळून जिवंत ठार मारून त्याला नदीत फेकल्याचे दिसून आले होते. प्रारंभी घनसावंगी पोलीस ठाण्यात स्थानिक पोलीस पाटील भगवंत आर्डे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या अर्भकाचे घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्येही त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे काळ सांयकाळी पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी रात्रीतून तपास चक्रे फिरवून याप्रकरणाचा १२ तासाच्या आतमध्ये पर्दाफाश केला. गावातीलच परित्यक्त्या महिलेला अनैतिक संबंधातून हे अर्भक जन्मले होते. या अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तिने जन्मलेल्या या अर्भकाचा गळा साडीने आवळून त्याला नदीच्या पाण्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी बाब तपास पुढे आल्याने त्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेचे कोणासोबत अनैतिक संबंध होते? आणखी यात कोणकोण आरोपी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सी. डी. शेवगन यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगीचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, मनोहर खिळदकर, सचिन कापुरे, पोलीस कर्मचारी . राऊत, देवडे, विठ्ठल वैराळ, जाधव, वैद्य, केंद्रे, महिला कर्मचारी मीरा मुसळे यांनी ही कामगिरी पार पडली आहे.