जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी केले स्वखर्चातून रोडचे काम

0
199

 

उपसंपादक /अशोक खंडारे

आष्टी_ ईलूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी आष्टी येथील वार्ड क्रं.४ मध्ये स्वखर्चातून रोडचे काम पूर्ण केले आहे
सदर रोड हा ३० मीटर लांबीचे असून झाडे यांच्या घरापासून ते सदगूरु शाळेपर्यंत आहे.र स्त्याअभावी निवासीतांना आवागमन करण्यास मोठी अडचण होती त्यांनी सांगितले की आम्हाला चिखल तुडवत जावे लागत आहे त्यामुळे त्यांनी २४ तासाचे आत स्वखर्चातून रोड काढुण त्यावर मुरुम टाकून रोडरोलर ने दबाई करुन २५ ते ३० निवासी कुटुंबांना रस्ता उपलब्ध करून दिला आहे.
रस्त्याचे लोकार्पण स्वता जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी केले यावेळी कांग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते प्रभुदास खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय पंदिलवार,चंदन मुखर्जी,राज भुरे,
रमेश चालुरकर व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
विषेश असे की वार्डवासीयांच्या मागणी नंतर अवघ्या २४ तासात हे रोडचे काम पूर्ण केले तर याकरिता जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांचे कौतुक केले जात आहे.