Home नागपूर माजी खासदार मा प्रकाशभाऊ जाधव व्दारे कन्हान च्या पत्रकारांना साहित्य भेट

माजी खासदार मा प्रकाशभाऊ जाधव व्दारे कन्हान च्या पत्रकारांना साहित्य भेट

171

 

कमलासिंह यादव
पाराशेवनी तालुका प्रीतानिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान (ता प): – शहरात कोरोना विषाणु संसर्ग आजाराचे वाढती रूग्ण संख्या लक्षात घेत माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी कन्हान येथील पत्रकारांना सुरक्षेकरिता फेससिड, सॅनिटाईझर बॉटल, मॉस्क आदी प्रतिबंधक साहित्य स्नेह भेट म्हणुन वाटप केले.
कोरोना संसर्गाची कन्हान शहर व परिसरात वाढती संख्या पाहता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता दिवसरात्र जीव मुठीत घेऊन निस्वार्थ सेवा करणा-या कन्हान पत्रकारांना सुरक्षेच्या दुष्टीने स्था निय रहिवासी शिवसेना रामटेक लोक सभेचे माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव व्दारे ग्रामिण पत्रकार संघ कार्या लय रेंघे भवन तारसा रोड कन्हान येथे ग्रामिण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी, एन एस मालविये सर, मोहन रंगारी, सुनिस सरोदे, चंद्र कुमार चौकसे, शांताराम जळते, रविंद्र दुपारे, रवी कोचे, गणेश खोब्रागडे, सतिश घारड, रोहित मानवट कर, दिनेश नानवटकर, किशोर वासाडे आदी पत्रकारांना फेससिड, सॅनिटाईझर बॉटल, मॉस्क आदी प्रतिबंधक साहित्य भेट देऊन आपण व आपल्या कुंटुबाची काळजी घेत हा लढा प्रामाणिकपणे लढ ण्यास नागरिकांत जनजागृती करून सुरक्षा प्रदान करित कोरोना वर आपण मात करू शकु अश्या प्रकारे कोरोना योध्दाचे मनोबल वाढवुन त्याचे अभिनंदन केले. यावेळी राजु रेंघे, सचिन साळवी, सतिश भसारकर, राधेशाम भोंगाडे, जितु पाली, आकाश चिखले, आयुष रेंघे आदी उपस्थित होते.

Previous articleयेणाऱ्या निवडणूक व संघटन वाढी विषयी आप ची चर्चा सभा संपन्न
Next articleअनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाचा खून करणारी माता जेरबंद घनसावंगी पोलिसांनी तपासाची च्रके वेगाने फिरऊन १२ तासात लावला छडा