गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे कायम ठेवावे – मा.श्री भास्करभाऊ तलांडे,सभापती पंचायत समिती अहेरी

153

 

प्रतिनिधी /रमेश बामनकर

गुड्डीगुडम : गडचिरोली जिल्ह्याचे विकासासाठी तळमळ करणारे जिल्ह्याचे जमिनी हकीकत असणारे सर्वांचे लाडके नेते श्री.मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात चे पालकमंत्री पद स्वीकारले व चांगल्या पद्धतीने यशस्वी पणे पेलली.पद स्वीकारल्या पासुन विजयभाऊ नी जिल्ह्यात अनेकदा दौरे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठके घेऊन जिल्हा विकासाचे आराखडा ही तयार करून जिल्हा विकासाला चालना मिळाला आहे.जिल्हा विकासासाठी शासनस्तरावरुन निधीचा उपलब्धता करून देण्यासाठी त्यांनी तत्पर होते.ना.वडेट्टीवार यांचे तडफदार नेते म्हणून नावलौकिक आहे.त्यांचे रूपाने जिल्ह्याला एक सक्षम पालकमंत्री मिळाल्याचे भावना जनमानसात निर्माण झाला आहे.त्यांच्या कार्यप्रणाली मुळे प्रशासन कामाला लागली आहे.चंद्रपूर जिल्ह्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा या करिता ना.वडेट्टीवार यांनी प्रयत्नशील आहेत.त्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना आखली.हे सर्व बाबी लक्षात घेता विजयभाऊ वडेट्टीवार यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कायम ठेवावे अशी मागणी अहेरी पंचायत समिती चे सभापती ना.भास्करभाऊ तलांडे यांनी पत्रकातून केली आहे.