चिमूर-नागभीड विधानसभेत आम आदमी पार्टी चा ‘मागेल त्याला उद्योग’ अभियान.

116

 

तालुका प्रतिनिधी- दिपक पाटील
चिमूर-
कोरोनामुळे उद्भवलेल्या बेरोजगारीच्या प्रश्नावर आम आदमी पार्टी चिमूर-नागभीड विधानसभेत ‘गाव तिथे उद्योग’ अभियानांतर्गत ‘मागेल त्याला उद्योग’ उपक्रमाची सुरुवात.

कोरोनामुळे अनेक जन बेरोजगार झाले असून, मुंबई, हैदराबाद, पुण्यासारख्या महानगरात नोकरी करीत असलेल्या आपल्याकडील अनेक युवकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. शिक्षण पूर्ण होऊनही सध्यस्थितीत नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होऊ शकत नाही. पारंपारिक उद्योग-धंदे, दुकाने पूर्णता आर्थिक नुकसानीत आहेत, यामुळे घरोघरी बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न उभा राहिलेला आहे.

अश्या स्थितीत युवक-युवतींना आर्थिक सक्षमता यावी व बेरोजगारीचा प्रश्न सुटावा म्हणून आम आदमी पार्टी तर्फे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर-नागभीड विधानसभेत ‘गाव तिथे उद्योग’ अभियानांतर्गत ‘मागेल त्याला उद्योग’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. हा उपक्रम चिमूर-नागभीड विधानसभेतील सर्व गावात पूर्ण एक महिना चालविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत दि. १५ आगस्ट पर्यंत ओंनलाईन व (९५०३०५६३५३, ७३५०१०८५४४, ९४२१७०१५२८) मोबाईल क्रमांकावर उद्योग करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवक-युवतींचे नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर आम आदमी पार्टी ची प्रशिक्षण चमू त्यांच्या घरी जाऊन उद्योगासंदर्भात मार्गदर्शन करून उद्योग उभारणीसाठी मदत करेल. शेती पूरक व गाव पातळीवर उपलब्ध असलेला कच्चा माल वापरून बाजारपेठ तयार असलेल्या कमीत कमी किमतीत चालू करता येणारे १५ उद्योग यावेळेस उभारून देण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत प्रत्येक इच्छुक युवक-युवतींना लहान-लहान उद्योगातून दरमहा १५-२० हजार रुपये इतके आर्थिक उत्पादन देवू शकणाऱ्या उद्योगावर मार्गदर्शन करण्यात येईल.

या अभियानासाठी प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी स्वयंसेवकांची चिमूर आणी नागभीड अशे दोन विभाग करण्यात आले असून नागभीड विभागातील सुरेशजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनात त्रिलोक बघमारे, प्रीतम कोरेवर, अनिल देशमुख, अमर देशमुख, प्रशांत तुपट, ज्ञानेश्वर खरकाटे, लोकेश जीवतोडे, सचिन निशाने, स्वप्नील उंबरकार, विक्की निशाने, देवानंद गायधनी, मसूद शेख, पुष्पा गोल्हेर, रीना भांदककर, संतोष ईखार, संतोष शर्मा, अविनाश दरारे तसेच चिमूर विभागातील आदित्य पिसे, मंगेश शेंडे, सुशांत इंदोरकर, विशाल बारस्कर, विशाल इंदोरकर, मोरेश्वर बाम्बोडे, ओंकार कोवे, आशिष चौधरी, नरेश बुटके, रुपेश घोनमोडे, यशवंत मेश्राम, दिलीप शेंडे, संजय केजिक, हर्षल मेश्राम, आशिष वाघमारे, चैतन्य जांभुळे, विजय मेश्राम, सुनील झाडे, दिगंबर सूर्यवंशी, भारत रामटेके, विशाल ढोक, मंगेश केजिक, अतुल खोब्रागडे, पवन पिसे, समिधा भैसारे, असे अनेक स्वयंसेवक ‘मागेल त्याला उद्योग’ या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत.