सोमनपल्ली गावाला मदतीचा हात. • पाथ फाउंडेशन व युवकांचा पुढाकार

प्रविन तिवाडे
चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली गावाला मागच्या वर्षी पुराचा मोठा फटका बसला होता. अनेकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पतालुक्याच्या ठिकानापासून २०-२५ किमी अंतरावर असून सुद्धा हे गाव अनेक सोयीसुविधांपासून वंचीत आहे. गावात जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही. तेथील रहिवाश्यांना जंगल मार्गाने ३ नाले ओलांडून २-३ किमी पायपीट केल्याशिवाय पर्याय नाही. पावसाळ्यात हे नाले भरल्यानंतर या गावाचा संपर्क तुटतो.
गावात एक घर वगळता सर्व घर मातीचे आहेत. पावसाळ्यात प्रत्येकांच्या घरात पाणी गळतीची समस्या असते. अश्या अनेक समस्या त्यांच्या पुढे उभ्या असतात.
२५ जुलै रोजी पाथ फाउंडेशन व चामोर्शीतील युवकांच्या माध्यमातून सोमनपल्ली गावात ताडपत्री, ब्लॅंकेट, टॉर्च व भांडे अश्या वस्तू मदत म्हणून देण्यात आल्या. यासोबतच मुधोली टोला व निकतवाडा या गावांमध्ये सुद्धा गरजूंना वस्तू मदत स्वरूपात देण्यात आल्या.
जंगल मार्गाने सामान घेऊन २-३ किमी पायपीट करत पाथ फाउंडेशनचे बोधी रामटेके, अनिकेत बांबोळे व डॉ.अजिंक्य चकोर, नीरज येग्लोपवार, चक्रधर मेश्राम यांनी प्रत्यक्ष मदत पोहचवली. अंकुश गोयल, डॉ. हरमानप्रित सिंह,सतीश जतेगावकर,अतिष चिंतलेवार हेलपिंग हॅन्ड, चामोर्शी यांनी या कामाला सहकार्य केले.
गडचिरोली जिल्ह्यात अशे अनेक गाव आहेत जे सोयीसुविधांपासून वंचीत आहेत. शासन त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असेलच पण प्रत्येकाने आपले सामजिक कर्तव्य समजून अश्या गावांना आपल्या परीने मदत पोहचविण्याचा प्रयन्त करत राहावा असे आवाहन पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.