तुकाराम मुंडे जर जनतेच्या हितासाठी शिस्त लावत असतील तर त्यांच्या मागे खंबीर उभे राहावे-मा.उद्धवजी ठाकरे (मुख्यमंत्री)

0
378

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

मुंबई : २६ जुलै २०२०
सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारला चौफेर घेरणाऱ्या भाजपा चे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातील मोदी सरकार, महाविकास आघाडी तील धुसपुस कोरोना संकटात सरकारची कामगिरी यांवर मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत (राज्यसभा खासदार) यांनी घेतलेली बेधडक मुलाखत सध्या गाजत आहे.
ही मुलाखत दोन भागात असुन २६ जुलै रोजी ती सामना च्या पेजवर प्रसारित होईल. या मुलाखतीत सामना चे संपादक संजय राऊत यांनी नागपुर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात असलेल्या भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संपुर्ण मनपा नाराजी व्यक्त करीत आहे. त्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची काय प्रतिक्रिया आहे? आपण नेमके कोणासोबत आहात? यांविषयी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आज दखल न्यूज भारत पोर्टल चैनल च्या हजारो प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत.

 

संजय राऊत. –
(संपादक, सामना) – तिकडे नागपुरात तुकाराम मुंडे च्या मागे सगळी मनपा हात धुवून लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढेंच्या सोबत आहात की, त्या लोकनियुक्त महापालिकेच्या, जी मुंढे यांच्या मागे लागलीय हात धुऊन?

मा. उद्धवजी ठाकरे
(मुख्यमंत्री)– तुमचं मत काय? कोणाचं बरोबर आहे?

संजय राऊत – मला असं वाटतं की, तुकाराम मुंढे आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे.

मा. उद्धवजी ठाकरे
(मुख्यमंत्री) – मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे?

संजय राऊत – अर्थात शिस्तीच्या मागे उभे राहायला पाहिजे.

मा. उद्धवजी ठाकरे
(मुख्यमंत्री)– मग तसंच आहे.
एखादा अधिकारी कठोर असेल, कडक असेल, पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही जनतेच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणल्या असतील हे काही जणांना पटलं नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱयाच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आततायीपणा किंवा आक्रस्ताळेपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगलं आहे.

शेवटी जनतासुद्धा उघडय़ा डोळय़ांनी हे बघत असते. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरून चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही.