Home नागपूर कन्हानला कडक टाळेबंदी,संचारबंदी लावा. सत्य शोधक संघाची मागणी

कन्हानला कडक टाळेबंदी,संचारबंदी लावा. सत्य शोधक संघाची मागणी

171

 

कमलसिंह यादव
पाराशेवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हांन (ता प्र): – जिल्हयात कामठीत कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भावाने तसेच कन्हा न शहरात प्रशासनाच्या दुर्लक्ष पणाने शहरासह ग्रामिण मध्ये कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्याने दिवसेदिवस रूग्णाची संख्या झपाटयाने वाढत असल्याने येथी ल शासन, प्रशासनास सत्य शोधक संघ व्दारे निवेदनाने कामठी व बाहेरचे येणारे हाथठेलेवाले, व्यापारी, दुकानदाराचे बिन धास्त पणे येणे जाणे बंद करून कमीत कमी १० दिवसाची कटक टाळेबंदी व संचारबंदी लावण्याची मागणी केली आहे.
कन्हान शहरात कामठीतुन येणाऱ्या व्यापारी, दुकानदार, फेरीवाले,भाजीवाले, फळवाले,सोनार,मोबाईल दुकाने,किराणा दुकान, चप्पल जुते, कपडेवाले, हॉटेल इतर छोटे मोठे दुकानदार असे ६०% दर रोज व्यवसायीक येणेजाणे करित असुन बहुतेकाचा मुख्य महामार्गावरच दुकानदा री करतात. हयाना स्थानिय प्रशासनाची रोखठोक नसल्याने बिनधास्त पणे ये-जा सुरू असुन बहुतेक नियमाचे पालन करि त नसल्याने कामठी सारखे कन्हान ला सुध्दा कोरोना संसर्ग रूग्णाचा उच्चांक गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता सोशल डिस्टसिंग, सॅनिटाईजर, मास्क व इतर सर्व नियमाचे पालन कर ण्याच्या शर्ती नुसार नगर प्रशासनाच्या परवाना धारक व्यावसायीकांना कन्हान नदीच्या पुला जवळील चौकीत कडक तपासणी करून प्रवेश देऊन विना परवा ना धारकाना येऊ देऊ नये. तसेच शहर वासीयांच्या सुरक्षेच्या दुष्टीने वाढती कोरो ना संसर्ग रूग्णाची साखळी तोडण्याकरि ता कडक टाळेबंदी,संचारबंदी लावण्या ची मागणी मा तहसिलदार, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, थानेदार हयाना सत्य शोधक संघ कन्हान व्दारे निवेदनाने सतीश भसा रकर, रजनीश मेश्राम, प्रशांत वाघमारे, शैलेश माटे, गौतम नितनवरे, अखिलेश मेश्राम, मयूर माटे, विक्की उके, निखिल रामटेके आदीने नागरिकांकडुन केली आहे.
१) मा.संजय पुज्जलवार, कामठी उप विभागीय पोलीस अधिकारी. हयाना निवेदन देताना.

Previous articleचिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या – यंग चांदा ब्रिगेडची मागणी पोलीस अधीक्षक यांना निवेदन
Next articleतुकाराम मुंडे जर जनतेच्या हितासाठी शिस्त लावत असतील तर त्यांच्या मागे खंबीर उभे राहावे-मा.उद्धवजी ठाकरे (मुख्यमंत्री)