पाइपलाइनच्याकामाची चौकशी करून मुख्याधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करा

191

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
आमदार व नागरिकांची पोलीस स्टेशन येथे तक्रार
नगर पंचायत चामोर्शी जिल्हा गडचिरोली अंतर्गत लक्ष्मी गेट ते शारदा राईस मिल पर्यंत नव्याने तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यावर शहरातील पाणी पुरवठा करिता नवीन पाईप लाईन टाकण्यात आले आहे सदर पाईप लाईन रस्त्याच्या बाजूने टाकणे गरजेचे असताना रस्त्याच्या मधोमध पाईप लाईन टाकून तेथेच कनेक्शन उभे केले ,रस्त्याची रहदारी लक्ष्यात घेऊन पाइपलाइन खोलवर टाकण्याचे गरजेचे होते ,परंतु एक फूट खोलवर निकृष्ठ दर्जाचे मुख्य पाइपलाइन टाकले आहे ,त्यामुळे पाइपलाइन वारंवार
फुटून पाणीपुरवठा खंडित होऊन
जनतेला नाहक त्रास सहन करावा लागणार तसेच या रस्त्याच्या मधोमध मुर्खासारखे उभे केलेले नळ कनेक्शन मुळे रस्त्यातून जाताना शाळकरी मुले वयोवृध्द महिला नागरिक यांच्या सोबत केंव्हाही मोठा अपघात घडू शकते परंतु सदर विषयाकडे नगरपंचायत मुख्याधिकारी व सबंधित ठेकेदार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे , आज सदर कामाची पाहणी आमदार डॉ देवराव होळी यांनी प्रत्यक्ष केली व येथील स्थानिक नागरिकांनी सुद्धा याबाबत आमदार डॉ होळी यांच्या कडे तक्रार केली
त्यामुळे आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी व नागरिक यांनी याबाबत पोलिस स्टेशन चामोर्शी येथे तक्रार केली ,
व सबंधित ठेकेदार नगर पंचायत
मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ? व सदर पाईप लाईन काम इस्टिमेट नुसार झाले काय ? या बाबत चौकशी करण्यात यावी ? अशी मागणी आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना केली .