पंचायत समिती कोरचीचे गट विकास अधिकारी देवरे यांनी दिली आस्वलहुडकी येथे भेट

161

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
कोरची मुख्यालयापासून सहा-सात कि.मी.अंतरावर असलेल्या आस्वलहुडकी येथील नागरिकांना डाहरीया, उलटी व तापाची साथ सुरू झाली या बातमीची दखल घेत पंचायत समिती कोरची येथील गट विकास अधिकारी डी.एम.देवरे तसेच अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी आस्वलहुडकी येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा केली.
कित्येक घराच्या समोर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. ते चिखल सफाई करावे जेणेकरून आपले आरोग्य सुदृढ राहील असे नागरीकांना देवरे यांनी पटवून सांगितले. तसेच ग्रामपंचायत आस्वलहुडकी येथील सचिव दिहारे यांना संपूर्ण गावात फवारणी करण्याचे सुद्धा निर्देश दिले. शनिवारी आस्वलहुडकीला भेट दिली असता तेथे नालीसफाई तसेच साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले.
गटविकास अधिकारी देवरे यांनी ग्रामपंचायत कार्यालय आस्वलहुडकी येथे भेट देऊन ब्लीचिंग पावडर व क्लोरीन लिक्विड बद्दल विचारणा करून पाहणी केली व लोकांचे आरोग्य सुदृढ व्हावे याकरिता उपाययोजना करण्याचे निर्देश सुद्धा ग्रामपंचायत सचिव यांना दिले. गावकर्यांनी सांगितल्याप्रमाणे वीस ते पंचवीस दिवस अगोदर गावातील नळांमध्ये ब्लीचिंग टाकण्यात आले होते. परंतु डायरिया ची साथ पाहता उपाययोजना म्हणून घरोघरी केमिकलची फवारनी करण्यात आली व क्लोरीन लिक्विड पाण्यामध्ये टाकण्यात आले.

कोट
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरासमोर चिखल जमा होऊ न देण्याचा सल्ला गावकऱ्यांना देण्यात आला असून गावच्या प्रत्येक नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे निर्देश गावकऱ्यांना देण्यात आले आहे. ग्रामपंचायत आस्वलहुडकी तर्फे उपाययोजना केल्या जात आहे.

डी.एम.देवरे
गटविकास अधिकारी पंचायत समिती, कोरची