Home कोल्हापूर सबजेलमधील आरोपीला दवा पार्टीस नेण्यासाठी हजेरी मेजरने केली आर्थिक देवाणघेवाण दोघांनी केली...

सबजेलमधील आरोपीला दवा पार्टीस नेण्यासाठी हजेरी मेजरने केली आर्थिक देवाणघेवाण दोघांनी केली डी.वाय.एस.पी.कडे लेखी तक्रार

351

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी // ऋषीकेश

सबजेलमधून खूनातील आरोपीला आंबे ता. पंढरपूर येथे घरी मटण पार्टीला जेवायला नेल्याप्रकरणात दोन पोलिसांना दवा पार्टीची डयूटी लावण्यासाठी दोन हजार रुपये आरोपीकडून हजेरी मेजर(सी.ओ.)ने घेतल्याची तक्रार नवनाथ गोरख यादव व आण्णासाहेब विठोबा आसबे यांनी मंगळवेढयाचे डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.
दि.17 रोजी मंगळवेढा सबजेलमधून खूनाच्या प्रकरणातील आरोपी तानाजी भोसले यांना दोन पोलिसांनी संगनमत करून थेट आरोपीच्या गावी आंबे येथे मटण पार्टीला जेवायला नेल्याचा प्रकार घडला होता.गावी जाण्यापुर्वी दवा पार्टीला नेण्यासाठी त्या दोन पोलिसांची डयूटी लावण्यासाठी हजेरी मेजरने दोन हजार रुपये घेतल्याचा आरोप नवनाथ यादव व आण्णासाहेब आसबे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. यादव व आसबे हे तलाठी कार्यालयात दि.16 रोजी कामानिमित्त गेले होते. यावेळी त्या दोघांच्या समोर आरोपी तानाजी भोसले यांचेकडून दोन हजार रुपये हजेरी मेजरने घेतल्याचा त्यांचा दावा आहे.दवा पार्टी लावण्यास वारंवार आरोपीकडून आर्थिक पिळवणूक केली जात आहे.सदर प्रकरणी निलंबीत केलेल्या दोन पोलिस कर्मचार्‍यांचा फेर जबाब घेवून यात दोषी असलेल्यांची चौकशी करून कारवाई करावी.हजेरी मेजर गणेश पाटील हे मूळचे लक्ष्मी दहिवडीचे असून त्यांची पत्नीही याच पोलिस स्टेशनला कार्यरत आहे.पाटील हे हजेरी मेजर असल्याने स्वतःच्या पत्नीला रात्रपाळी दिवसपाळी अशी डयूटी न लावता त्यांच्या सोयीने डयूटी लावून त्याचा गैरफायदा घेत आहेत.परिणामी इतर कर्मचार्‍याचा त्याचा परिणाम होत आहे. सांगोल्याला असतानाही असाच प्रकार घडल्याने तिथे वादग्रस्त ठरले होते. हजेरीच्या वेळेस त्यांची पोलिस पत्नी कधीच येत नाही.अन्य कर्मचारी थोडे जरी उशीरा आले तरी त्यांची गैरहजेरी मांडली जात असल्याचा या निवेदनात मुद्दा मांडण्यात आला आहे. पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्या दोघांनी केली आहे.

Previous articleयवतमाळ जिल्ह्यात चौरस मीटर प्रमाणे मिळतो मोबदला तर मग चंद्रपूर जिल्ह्यात का नाही,एकनाथ थुटे यांची मागणी
Next articleपंचायत समिती कोरचीचे गट विकास अधिकारी देवरे यांनी दिली आस्वलहुडकी येथे भेट