रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत ६५० लोकांनी बनवुन घेतला स्व्त:चा दुर्घटना अपघात विमा

0
43

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

स्थानिक अकोट शहरात अकोट पोलीस स्टेशन अकोट रोटरी क्लब, जेसीआय अकोट, भारतीय स्टेट बँक व शेतकरी मोटर्स च्या संयुक्त् विदयमाने अपघात विमा जनजागृती दिनांक ५ व ६फेब्रुवारीला करण्यात आली. त्याकरीता एक स्टॅाल अकोट पोलीस स्टेशन अकोला रोड अकोट येथे ठेवण्यात आलेला होते. कॅम्पच्या दोन्ही दिवशी मिळुन त्यामध्ये पोलीस स्टेशन चे ठाणेदार संतोष महल्ले यांनी स्वतः व त्यांचे समस्त् पोलीस कर्मचा-यांनी व अकोट शहरातील अनेक जागृत नागरिकांनी उत्सुर्फत प्रतिसाद देत ६५० लोकांनी त्याठिकाणी भेट देऊन आपला विमा काढुन घेतला. हया अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना ज्याचे प्रिमीयम फक्त वर्षीक १२रु. भरुन आपल्याला आपला अपघात किंवा दुर्घटना विमा २लाख रुपयाचा काढुन मिळतो त्यासोबतच लोकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ज्याचे प्रमियम ३३० आहे.हया अंतर्गत कोणत्याही नैसर्गीक र्मत्यु ओढावल्यास अर्जदारास २ लाखाचे कवच मिळते.हया कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमा करीता अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले ,स्टेट बँकेचे शाखाधिकारी श्रीरंगजी कुलकर्णी , साहायक ऑफीसर रोहीत अंबुलकर,शेतकरी मोटर्स चे संचालक तथा रोटरीचे माजी अध्यक्ष नंदकिशोरजी शेगोकार , जेसीआय अकोट चे अध्यक्ष नितीन शेगोकार, रोटररीचे संजय बोरोडे व अनंतरावजी काळे उपस्थीत होते. हया वेळी ठाणेदार संतोष महल्ले हयांनी हया प्रकल्पा बद्दल गौरव उदगार काढत हया प्रकल्पाची नितांत आवश्यकता असुन हा प्रकल्प नियमीत पणे अकोट शहरात वेगवेगळया ठिकाणी नेहमी घेत राहु की ज्यामुळे जास्तीत जास्त् लोक आपले विमा काढु शकतील व स्वत:हला विमा सुरक्षा कवच देऊ शकतील.भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी यांनी हया योजनेचे स्वागत करत हया विमा पॉलीसी त्यांच्या शाखे मध्ये नेहमी काढुन मिळतील येवढेच नाही तर शेतकरी मोटर्स येथे पण आपण आपला विमा काढुन घेउु शकतो अशे प्रशसनिय उदगार काढत आयोजकांचे त्यांनी आभार मानले. अयोजकांच्या वतीने सर्व जनतेस विनंती करण्यात येते की हा विमा आपल्या बँकेत जाऊन काढुन घ्यावा आपले व आपल्या कुटुंबाचे तथा संबंधीतांचे विमा सरक्षंण करुन घ्यावे.कार्यक्रमाचे आभार प्रदर्षन जेसीआयचे उपाध्यक्ष विनोद कडु यांनी केले. हया कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता स्टेट बँकेचे कर्मचारी गजाननजी तायडे, सशील तायडे , ट्राफीक पोलीस सुनील नागे, आशिष नांदोकार, गणेश फोकमारे, गोपाल निमकर्डे शेतकरी मोटर्स चे कर्मचारी अजिंक्य नाथे , वैभव काळे, श्रीकृष्ण नाथे, विनोद कडु, अजिंक्य तेलगोटे यांनी परिश्रम घेतले. अशी माहीती रोटरीचे जनसंपर्क अधिकारी कल्पेश गुलाहे कळवितात.