मुक्तीपथ अभियानाच्या वतीने राजाराम (खां)येथे व्यसन उपचार शिक्षण शिबीर संपन्न…. 20 व्यसनीनी घेतले उपचार…

0
96

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुडडीगुडम : अहेरी तालुक्यातील राजाराम (खां)येथे आज दि.25 जुलै रोजी मुक्तीपथ तालुका कार्यालय आणि मुक्तीपथ गाव संघटना राजाराम यांच्या संयुक्त माद्यमाने एक दिवसीय व्यसन उपचार शिक्षण शिबिर कार्यक्रम राजाराम येथील ग्राम पंचायत भवनात आयोजित केले होते.
व्यसन उपचार शिक्षण शिबिराचे उदघाटक श्री विजय कोल्हे पोलीस उपनिरीक्षक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हनमंतु आकदर अध्यक्ष, पंचशील बहुउद्देशीय संस्था राजाराम खां.होते.
सदर उपचार शिबिरात राजाराम येथील 20 रुग्णांनी उपचार घेतले.कार्यक्रम यशस्वी करिता मुक्तीपथ गाव संघटना राजाराम यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी श्री.केशव चव्हाण तालुका संघटक, श्री मारोती कोलावार तालुका प्रेरक अहेरी/भामरागड, श्री साईनाथ मोहूर्ले समुपदेशक, कु.पूजा येलूरकर संयोजिका व तालुका टीम व गावातील नागरिक, युवक उपस्थित होते.