फवारणीचे औषध आणण्यासाठी गेलेल्या इसमास मारहाण करुन रोख रक्कम पळविली

0
179

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी,युवराज डोंगरे)
फवारणीचे औषध आणण्यासाठी आठवडी बाजारात गेलेल्या इसमाजवळील रोख रक्कम चोरुन त्यास दोघांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना दर्यापूर येथे घडली
भारत मुरकुटे असे मारहाण केलेल्या इसमाचे नाव असुन अन्नू सोद्दीन सरफोद्दीन वय 24 वर्ष रा बाराखोली बनोसा ,धनराज पुंडलीक खत्री वय 27 वर्ष रा गांधी नगर बनोसा असे आरोपींचे नाव आहे
भारत मुरकुटे हे आठवडी बाजार दर्यापूर(बनोसा) येथे फवारणीसाठी लागणारे औषध खरेदी करण्यासाठी गेले होते दोन्ही आरोपींनी त्यांना मारहाण करुन जखमी केले व त्यांच्या खिशातील 2500रुपये व मोबाईल चोरुन पळ काढला याप्रकरणी दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असुन पोलीसांनी आरोपीविरुध्द कलम 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे