गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे कायम ठेवावे – नक्षलपीडित पुनर्वसन समिती गडचिरोली मा.उद्धवजी ठाकरे ,मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनातून मागणी….

137

 

संपादक-जगदीश वेन्नम/रमेश बामनकर

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे विकासासाठी तळमळ करणारे जिल्ह्याचे जमिनी हकीकत असणारे सर्वांचे लाडके नेते श्री.मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कायम ठेवावे.कारण मा.वडेट्टीवार स्थानिक व सर्व परिचित असल्यामुळे साधारण व्यक्ती सुध्दा साहेबाना भेटून आपली समस्या चे निराकरण करू शकतात.गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे.गडचिरोली जिल्ह्यात नक्षल ही एक समस्या गंभीर आहे.हे समस्या स्थानिक नेतेच हाताळू शकतात.त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील जमिनी हकीकत पुर्ण अनुभव आहे.नक्षलांच्या अत्याचाराला कंटाळून गावातील शेती, संपती, गाय, बैल, शेळ्या मेंढ्या असे अनेक संपत्ती सोडून जिल्हा मुख्यालय गडचिरोली येथे स्थानिक झालेले अनेक नक्षलपीडित आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलपीडितांचे पुनर्वसन बद्दल मंत्रालयात प्रश्न मांडून नक्षलपीडिताना कुठे व कसा करायचं? या बद्दल मा.वडेट्टीवार साहेबांचा प्रयत्न चालू असताना मा.वडेट्टीवार यांच्याकडे असलेल्या गडचिरोली जिल्हा पालकमंत्री पद काढुन घेतल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नक्षलपीडित नाराज झाले आहेत. सदर बाबीचा विचार करून मा.वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्री पद कायम ठेवावे. अशी मागणी नक्षलपीडित पुनर्वसन समिती गडचिरोली कडून मा.विजयभाऊ वडेट्टीवार राज्यमंत्री यांच्या मार्फत मा.श्री.उध्दव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदनातून केले आहे