पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी (PM SWANIDHI)योजनेचा लाभ घ्यावा-नागेश फाये

453

पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली
आत्मनिर्भर निधीतून लहानातून लहान व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणू या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृती अभियानाचा भडगाव येथे शुभारंभ केला. देशात सध्या कोविड:१९ या कोरोना महामारीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला असून याची जाणीव केंद्र सरकारला आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे त्यांच्याजवळ खेळते भांडवल नसल्याने त्यांचे व्यवसाय अडचणीत आलेले आहेत. अर्थव्यवस्थेच्या महत्वाचा घटक असलेल्या पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आत्मनिर्भर निधीची घोषणा केल्याने या योजनेतून जिल्ह्यातील पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडी विक्रेते,भाज्या, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजी पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीर द्वारा उत्पादित वस्तू विक्रेता पुस्तक स्टेशनरी तसेच केश कर्तनालय, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुलाई व लॉड्री दुकानदार असे लहान मोठे बारा बलुतेदार व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी १०,००० रु. पर्यंत खेळते भांडवल देण्याचा निर्णय घेतला आहे. यांचा लाभ सर्व शहरात राहणारे आणि ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या पथविक्रेत्यांनी लाभ व्हावा.
आत्मनिर्भर निधीतून लहानातून लहान व्यावसायिकांना नवसंजीवनी देण्याचा माझा प्रयत्न असून यासाठी प्रत्येक शहरात जनजागृती अभियान सुरू केले आहे
विशेषतः आज कुरखेडावासीयांसाठी जनजागृती अभियान सुरू केले असून खेळते भांडवल योजनेचा कुरखेडा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन नागेश फाये यानी केले आहे. सदरील योजना हि १००% केंद्र सरकार पुरस्कृत आहे. शहरातील पथविक्रेते व ग्रामीण भागातुन शहरात येणारे पथविक्रेते यांना १०,००० रु. पर्यंत खेळते भांडवल पुरवठा करण्यात येणार असून अतिशय सोपी प्रक्रिया भरून यात तात्पुरते विक्री प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बॅंक पास बुक झेरॉक्स हे घेऊन आपल्या शहरातील जवळचे ई सेवा केंद्र, (CSC सेंटर) येथे जावून ही माहिती भरावायची आहे. या योजनेचा लाभ घेत पथविक्रेता व्यवसायिक बान्धवाणी आपला व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू करावा. आत्मनिर्भर निधीतून लहानातून लहान व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे.