युवारंग आरमोरी तर्फे सर्पमित्रांचा सत्कार

141

 

हर्ष साखरे तालुका प्रतिनिधि
आरमोरी

आरमोरी :-
युवारंग क्लब आरमोरी तर्फे दि.25 जुलै 2020 ला नागपंचमी निमित्य आरमोरी येथील सर्पमित्रांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवारंग चे मार्गदर्शक मा.जयकुमारजी मेश्राम, उद्घाटक म्हणून मा. मनिषजी राऊत सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून आरमोरी येथील सर्पमित्र देवाभाऊ दुमाणे, दिपकभाऊ सोनकुसरे, करण भाऊ गिरडकर, वसीम शेख, हितेश लाडे उपस्तीत होते, युवारंग क्लब तर्फे सर्पमित्र याना एक वृक्ष, आणि शाल देऊन सत्कार करण्यात आले. मा. देवाभाऊ दुमाणे यांनी सापांच्या जाती, आणि कोणते साप विषारी असतात, आणि सापांविषयी असणाऱ्या अंधश्रद्धेला बळी न पळता सापांना जीवनदान द्या, याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रफुल खापरे यांनी केले, तर प्रास्ताविक राहुल जुआरे, आणि आभार प्रदर्शन राकेश सोनकुसरे यांनी मानले, कार्यक्रमाला युवारंग चे सदस्य उपस्तीत होते.