कन्हानची आरोग्य यंत्रणाच कोरोनाच्या विळख्यात अडकत चालली

0
384

 

कमलसिह यादव
पारारीवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

कन्हान(ता प्र):-कन्हान शहरात कोरोना महारोगाने थैमान घातला आहे. कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत . शुक्रवारला कन्हान येथीलआरोग्य केन्दांत र्सव ४२कर्मचारी चा रोविट टेस्ट कर०यात आला कोरोना योध्दा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी कोरोना बाधित आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाचं म्हणजे गुरुवारला आरोग्य केंद्रातील परिचारक कोरोना बाधित आलेला होता तर शुक्रवारला कोरोना बाधित आढळले असल्याने शहरासह आरोग्य यंत्रणा देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत चालल्याचे दृश्य आहे.
कन्हान शहरात कोरोनाचा संकट गडद असताना कन्हानची आरोग्य यंत्रणाच कोरोनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. गुरुवारी कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारक कोरोना बाधित आढल्यानंतर शुक्रवारला आरोग्य विभागाच्या रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३५ वर्षीय महिला आरोग्य अधिकारी कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे, शहरातील आरोग्य विभागच बाधित झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरलेल्या अवस्थेत आहे, अश्यात कोरोना योद्धेच कोरोनाच्या विळख्यात अडकत चालल्यास शहराचे काय असा प्रश्न वरिष्ठ अधिकार्यांना पडलेला आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान कडून १९ जुन पासून कोरोना तपासणीचे काम. करत आहे
दरम्यान आरोग्य यंत्रणा कमी असल्यामुळे शहर आणि ग्रामीण मध्ये कार्य करताना यंत्रणेतील दोन योद्धे कोरोना बाधित झाले अश्यात त्यांच्या सह कर्तव्य बजावणारे श्वेता मेश्राम (लॅब टेक्निशियन), अजय राऊत, सविता लिल्हारे सुरेंद्र गिर्हे (आरोग्य सेवक), गौरव भोयर (वाहन चालक) यांनी स्वतःला होम कोरंटीन करण्याचे निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉः योगेश चौधरी यांच्या सुपूर्द केलेला असून शुक्रवारला आरोग्य केंद्र बंद करून सेनेटाईज करण्यात आले आहे.