नियंत्रणासाठी नगर प्रशासन, महसुल विभाग,सह पोलिसांचा रूटमार्च

121

 

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रीतानिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र):-कन्हान शहरात वाढता कोरोनाचा उद्रेक बघता कोरोना विषाणू बाबत सूचनांचे पालन करण्यासाठी कन्हान पोलीस यांच्या वतीने शुक्रवारला शहरात रूटमार्च काढण्यात आला. यावेळी तहसीलदार वरून कुमार सहारे आणि पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी पोलीस ताफ्या सह शहराचा कानाकोपरा पिंजून काढत कोरोना विषाणूबाबत जनजागृती व शहरवासीयांना सूचनांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसार्गावर उपाय योजनांचा भडीमार सुरु झालेला असतांना त्याचाच एक भाग म्हणून कन्हान शहरात शुक्रवारला रूटमार्च काढून कोरोना प्रादुर्भाव थांबविन्यासाठी नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांनी शहरातील प्रत्येक भाग पायी पिंजून शहरवासीयांना आवाहन केले कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
नागरिकांनी एकाच ठिकाणी जमू नये
शहरवासीयांना जनजागृतीद्वारे सांगण्यात आले आहे रूटमार्च मध्ये पोलिसांच्या वाहनातून स्पिकरद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या,रूटमार्च मधून शहरातून शहरातील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देवून कोणीही घराबाहेर न पडता पाच पेक्षा अधिक नागरिकांनी एकाच ठिकाणी जमू नये अशाही सूचना देण्यात येवून कायद्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे.कोरोना विषाणूला न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले याचेशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.रूटमार्च मध्ये तहसीलदार वरून कुमार सहारे,गट विकास अधिकारी प्रदिप कुमार बमनोटे,पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी, सहायक निरिक्षक अमित अत्राम,कन्हान नगर परिषद मुख्याधिकारी संदीप चिद्रवार ,मंडळ अधिकारी जगादिश मेश्राम,. तलाठी, महेन्द्र क्षीरसागर नगर परिषद प्रशासन आणि संपूर्ण पोलीस कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते.