युरिया खताचे काळेबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही : आ. विनोद अग्रवाल

0
100

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज

गोंदिया : जिल्ह्यात विविध ठिकाणी रासायनिक खतांचा विशेषतः युरियाचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या विविध माध्यमातून पुढे येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. शेतकऱ्यांना आधीच पावसाची अनियमिततेमुळे त्रासले असताना समाजकंटकांकडून युरिया खतांना साठा करत शेतकऱ्यांना जास्त दरात विकण्याचे कार्य केले जात आहे. यांच्याविरोधात आमदार विनोद अग्रवाल यांनी बंड पुकारत यापुढे युरिया आणि रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, अशा कठोर शब्दात निंदा केली. शिवाय युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांना शासकीय नियमानुसार दंड आणि शिक्षा करण्यासाठीही तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली. रेल्वेच्या माध्यमाने गोंदिया जिल्ह्यासाठी आलेल्या रासायनिक खतांची पाहणी करत असताना आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांचा पुरवठा सतत सुरू ठेवण्याचा आग्रह शासकीय अधिकाऱ्यांना केला. एकूण १४०० टन युरिया गोंदिया जिल्ह्यासाठी प्राप्त झाला असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचवायचे कार्य करण्याची सूचना अधिकऱ्यांना केली.
युरियाचा काळाबाजार करत असणाऱ्यां च्या विरोधात खंबीरपणे उभे राहून त्या बाबतची माहिती शासकीय अधिकाऱ्यांना तसेच मला व्यक्तिगत पुरवण्याचं आव्हान शेतकऱ्यांना केला आहे. अशा लोकांच्या विरोधात कठोर पावले उचलली जातील असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले.