गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षाच्या मुलासह इतर 18 जणांची कोरोनावर मात चामोर्शी येथील महिला व सिरोंचा येथील एका पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव

0
123

 

गडचिरोली,(जिमाका),दि.25: जिल्ह्यात आज 19 जणांनी यशस्वीरित्या कोरोना वर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यामध्ये सिरोंचा येथील तीन वर्षाचा मुलगा आई-वडिलांसह दि 15 जुलैला कर्नाटक येथून परतला होता. त्यापैकी मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तीन वर्षाच्या मुलाने यशस्वीरित्या आज कोरोनावर मात केल्याने त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. इतरांमध्ये सीआरपीएफ गडचिरोली येथील 16 जवान, एक एसआरपीएफ जवान व भामरागड येथील एका युवकाचा समावेश आहे.

तर सकाळी 67 कोरोना बाधितांनंतर अजून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये चामोर्शी जयरामपूर येथील एक महिला व सिरोंचा येथील एका पुरूषाचा समावेश आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त 254 तर सद्या सक्रिय कोरोनाबाधित 255 झाले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधित संख्या 510 झाली आहे.