नाका तपासणी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई परजिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करताना १ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीची देशी विदेशी दारुसह ४ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

 

बिंबिसार शहारे
प्रतिनिधी दखल न्युज

गोंदिया दि.२५/०७/२०२०:
संपूर्ण जग कोरोना महामारीसारख्या भीषण संकटात सापडला असतानासुद्धा अवैध धंदे दिवसेंदिवस वाढतच आहेत अशातच जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे लॉकडाऊन च्या काळात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. अशातच २४ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नाकाबंदी करत असताना

 

केशोरीकडून दारूबंदी लागू असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जाणारी एक चारचाकी वाहन क्रमांक एम एच ३१ सीएस १७७६ ची तपासणी करण्यात आली असता त्या गाडीमध्ये ३३६००/- रुपये किमतीचे इम्पेरिअर ब्लू विदेशी दारू तसेच ७८०००/-रुपये किमतीचे देशी दारू मिळून आली त्यामुळे सदर चारचाकी फियाट कंपनीची वाहन व विदेशी दारू असा एकूण ४ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व आरोपींवर केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.