आमदार कृष्णा गजबे यांनी प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य वडसा/देसाईगंज तालुक्यातील वृद्ध,अंध (दिव्यांग) व्यक्तींना केले रेशन व किराणा कीटचे वाटप आमदार कृष्णा गजबे यांनी स्वतः रक्तदान करून प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या प्रती केली कृतज्ञता व्यक्त

168

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा

देसाईगंज- गडचिरोली जिल्ह्यातील सहकार नेते आणि भारतीय जनता पार्टीचे युवकांचे मागर्दर्शक प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी स्वतः रक्तदान करून प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. आमदार कृष्णा गजबे म्हणाले कि एक रक्ताचा थेब सुद्धा माणसाचे जीवन वाचवू शकतो आणि आयुष्यात अनेकांच्या जीवनासाठी आपले रक्त कामात आणावे असे उद्धार त्यांनी काढले. सोबतच प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य देसाईगंज तालुक्यातील गरजू वृद्ध, अंध (दिव्यांग) व्यक्तीना रेशन व किराणा कीटचे वाटप आज २५ जुलै रोजी केले.