24 तासात 21 नवे  रुग्ण एकूण  पॉझिटिव्ह  1520 एकूण बरे झाले 953

157

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 21 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1520 झाली आहे.
काल रात्री पाठविण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये एका रुग्णाचे नाव दापोली व रत्नागिरी या दोन्ही ठिकाणी दाखविण्यात आलेले असल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1521 झाली होती परंतु सदरची संख्या 1520 आहे.
दरम्यान 49 रुग्णांना   बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 953 झाली आहे.  आज बरे झालेल्यांमध्ये  कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली  8,  उपजिल्हा रुग्णालय कामथे-2, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 26, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे येथील 12 रुग्ण आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी – 11 रुग्ण
दापोली-10 रुग्ण

दखल न्यूज भारत