चामोर्शी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकाची लांबी दीड किमी. मंजूर!.. आमदार डॉ, देवरावजी होळी यांच्या पाठपुराव्यास यश!,, केंद्रीय परिवहन व सडक मंत्री मा.ना.नितिनजी गडकरी यांच्याकडे केली होती मागणी!… रस्ता दुभाजकाची मंजुरी केवळ 800 मीटर ऐवजी आता दीड किमी होणार!….

0
41

 

आष्टी प्रतिनिधी प्रविण तिवाडे
दिनांक 1 फेब्रुवारी २०२१ गडचिरोली
गडचिरोली ते आष्टी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-C या महामार्गावर चामोर्शी शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुभाजकाची लांबी केवळ 800 मीटर मंजूर होती ती अत्यंत कमी होती. त्यामुळे त्याची लांबी वाढवून २ किलोमीटर करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ, देवरावजी होळी यांनी केंद्रीय सडक व परिवहन मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन पत्राद्वारे सदर मागणी केली होती
माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे जलद गतीने सुरू असून अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. गडचिरोली ते आष्टी या राष्ट्रीय मार्गाचे काम देखील प्रगतिपथावर आहे. चामोर्शि शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गावरील रस्ता दुभाजकाची लांबी आ,डॉ होळी यांच्या मागणीची दखल घेऊन दीड किमी मंजूर करण्यात आली आहे.चामोर्शी हे तालुका केंद्र असून मोठी नगरपंचायत आहे. या रस्त्याची शहरातून जाणारी लांबी किमान २ किलोमीटर असल्याने कमीत कमी २ किलोमीटर रस्ता दुभाजक होणे आवश्यक होती. ही बाब आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यावर नुकताच निर्णय झालेला आहे. त्यामुळे रस्ता दुभाजक 800 मीटर ऐवजी दीड किलोमीटर करण्यात येणार व चामोर्शी शहरातील सौंदर्यात आणखीनच भर पडेल व चामोर्शी नगरी या रस्ता दुभाजका मुळे शहराचा रूप धारण करेल याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचे संपूर्ण शहर वसियांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले आहे ही मागणी अखेर आज मंजूर करण्यात आले आहे याबद्दल आमदार डॉ होळी यांचे चामोर्शी शहरवासीय यांनी अभिनंदन केले आहे