Home रत्नागिरी पोसरे सडेवाडी येथील सलग तिसऱ्या वर्षी एक हजार रोपांची लागवड करून वनिकरणाची...

पोसरे सडेवाडी येथील सलग तिसऱ्या वर्षी एक हजार रोपांची लागवड करून वनिकरणाची धरली कास.

145

.

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

खेड : तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या पोसरे या गावातील सडेवाडी येथील ग्रामस्थांनी वनीकरणाची कास धरली आहे. यावर्षी सडेवाडीतील ग्रामस्थांनी बांबू, साग, खैर, काळीमिरी, शिसम आदी प्रकारच्या एक हजार रोपांची लागवड केली. पोसरे गावात सलग तीन वर्षे या वाडीतील ग्रामस्थांनी वृक्षारोपणाचे काम हाती घेतले आहे. सामजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उदय भागवत, तौफिक मुल्ला, लक्ष्मण चितळे, अशोक ढाकणे यांचे प्रोत्साहन आणि अनुलोम या संस्थेचे प्रथमेश पोमेंडकर व मनिषा दळवी यांचे विशेष मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले आहे. सन २०१८ मध्ये १५०० रोपे, २०१९ मध्ये २५०० रोपे तर यावर्षी एक हजार रोपांची लागवड केली आहे. सडेवाडीमध्ये जलसंधारणासाठी अनेक उपाय केले गेले आहेत. डोंगराच्या माथ्यावर पाणी साठवण टाक्या उभारण्यात आल्या आहेत. जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या उल्हास परांजपे यांच्या माध्यमातून एक लाख लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या १३ फेरोसिमेंट टाक्या उभारण्यात आल्या आहेत. साठवलेल्या पाण्याचा वापर करून हळद व सूरण यासारख्या नगदी पिकांची लागवड केली आहे. पोसरेचे सरपंच अनंत साळवी, ग्रामसेवक संभाजी जाधव व सूरज गवई यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले. उपक्रम राबवण्यासाठी विनोद झोरे, दिपक झोरे. बजाजी करंजकर, गणेश महागांवकर यानी विशेष प्रयत्न केले.

*दखल न्यूज भारत*

Previous articleकोवीडच्या नावाखाली एस.टी. खाजगीकरण करण्याचा शासनाचा डाव : बाबासाहेब ढोल्ये
Next articleपुण्यातील स्वयंसेवी संस्था कोकणवासियांच्या मदतीला