कोवीडच्या नावाखाली एस.टी. खाजगीकरण करण्याचा शासनाचा डाव : बाबासाहेब ढोल्ये

 

प्रतिनिधी / प्रफुल्ल रेळेकर.

रत्नागिरी : महाराष्ट्र परिवहन महामंडळाने स्वेच्छा निवृत्तीच्या नावाखाली २१ हजार कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचा मनसुबा रचला आहे.६ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याचा संभव आहे.करोनाचे सावट आणि आर्थिक हानीचे निमित्त साधून एस.टी. महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रमुख बाबासाहेब ढोल्ये यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना ढोल्ये म्हणाले,एस.टी.ही जीवनवाहीनी आहे.लालपरीची नाळ गोरगरिबांशी जुळलेली आहे.वर्षानुवर्षे काम केलेल्यांना निवृत्ती ठीक आहे.पण कार्यरत कर्मचाऱ्यांना कमी करणे वा भरती रोखणे हे अन्यायकारक आहे.याविरोधात समविचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.काही वर्षापूर्वी अशाच नोकरकपातीत समविचारींनी यशस्वी आंदोलन करुन न्याय मिळवून दिला होता.
याबाबत शासनस्तरावर या कर्मचाऱ्यांवरील अन्यायाला दाद मागण्याची तयारी सुरु असल्याचे प्रदेश अध्यक्ष बापू कुलकर्णी,महासचिव श्रीनिवास दळवी,युवा प्रमुख निलेश आखाडे,प्रांतिक सदस्य अनुप हल्याळकर,सौ.जान्हवी कुलकर्णी ,सौ.सविता फडणीस यांनी सांगितले.

*दखल न्यूज भारत*