प्रकाश सावकार पोरेड्डीवार  यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
122

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
आरमोरी दि 25 जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील सहकार नेते आणि भारतीय जनता पार्टीचे युवकांचे मार्गदर्शक मा. प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक २५ जुलै रोजी आरमोरी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील सहकार नेते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब यांचा आज २५ जुलै रोजी वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी स्वतः रक्तदान करून प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली –
कोरोना चे संकट जगावरती असतानासुद्धा आरमोरी येथील युवा मंच या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत हितकारणी हायस्कूल च्या जवळील क्रीडा तालुका क्रीडा संकुल भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात जवळपास ४५ ते ५० युवकांनी आपलं रक्तदान केलं या रक्तदान शिबिरामध्ये प्रामुख्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनीसुद्धा रक्तदान केले यासोबतच आरमोरी येथील नगराध्यक्ष पवन नारनवरे नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, चंदू आकरे या युवकांनी सुद्धा रक्तदान केलं सोबतच या क्रीडा संकुलामध्ये जवळपास पन्नासच्या आसपास युवकांनी आपले रक्तदान केले . सकाळी आरमोरी येथील वॉर्ड नंबर २ मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा वृक्षारोपण क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरमोरी येथील नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पवन नारनवरे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार नगर परिषदेचे उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी,आरोग्य सभापती भारत बावनथडे, युवकांचे नेते नंदू नाकतोडे, आरोग्य सभापती नगर परिषद पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, सोनटक्के, गोपाल खेडकर आदी मंडळी या वृक्षारोपण आले उपस्थित होते तसेच क्रीडा संकुलाच्या भव्य रक्तदान शिबिर याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे आरमोरी पंचायत समितीच्या सभापती नीता ढोरे, महिला तालुका महिला तालुका भाजपा अध्यक्ष डॉक्टर संगीताताई रेवतकर, नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजप ता अध्यक्ष नंदू पेट्टेवार,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे ,विलास भाऊ पारधी ,नंदू नागतोडे पंचायत समिती सदस्य विवेक खेवले , गुरुदेव ढोरे, जितेंद्र ठाकरे, वडसा वरून आलेले सागर नाकाडे, राकेश गोंगल, जयंत मागीलवार, चंदू आकरे, पवन पिलारे ,नकुल नाकाडे, जितेंद्र ठाकरे, ओमकार मडावी आणि इतरही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी युवा मंच चे पदाधिकारी यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते हा रक्तदान शिबिर श्री डॉक्टर रिजवान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन गडचिरोली येथून आरोग्याची टीम या वेळी उपलब्ध होती या रक्तदान याप्रसंगी बोलताना आमदार कृष्णा गजबे म्हणाले की एक रक्ताचा थेंब सुद्धा माणसाचे जीवन वाचवू शकतो आणि त्यासाठीच माणसांनी आयुष्यात जास्तीत जास्त वेळा रक्तदान करून वाचावे आणि आयुष्यात अनेकांच्या जीवनासाठी आपले रक्त कामात आणावे असे उद्गार त्यानि काढले सोबतच सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम युवा मंचच्या माध्यमातून घेण्यात आला याबाबत युवा मंच चे सर्व पदाधिकारी हे कौतुकास्पद असल्याचे उदगार आमदार कृष्णा गजबे यांनी या प्रसंगी काढले. या शिबिराला मोठ्या संख्येने आरमोरी शहरातील विविध युवक वर्ग उपस्थित होता या शिबिराच्या यशस्वितेसाठी युवा मंच चे पंकज भाऊ खरवडे ,नंदूभाऊ नागतोडे ,उत्सव आंबडकर ,जितेंद्र ठाकरे, इतरही युवा मंच या पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.