बिंबिसार शहारे
प्रतिनिधी दखल न्युज
भंडारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात आज 8 रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला तर 8 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये लाखांदूर तालुक्यातील 3, पवनी तालुक्यातील 3, तुमसर व मोहाडी तालुक्यातील प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 179 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 223 झाली असून 42 (दोन संदर्भित) क्रियाशील रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 02 आहे.
आज 25 जुलै रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 43 व्यक्ती भरती असून 654 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1308 व्यकींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 112 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 1296 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.