मुक्तीपथ अभियानाच्या वतीने संड्रा येथे व्यसन उपचार शिक्षण शिबिर संपन्न….. 13 व्यसनीनी घेतले उपचार…

137

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील मौजा
संड्रा येथे मुक्तीपथ तालुका कार्यालय अहेरी व मुक्तीपथ गाव संघटना संड्रा च्या संयुक्ताने एक दिवसीय व्यसन उपचार शिक्षण क्लिनिक कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा संन्ड्रा येथे आयोजित केले होते.
सदर व्यसन उपचार शिक्षण क्लिनिक शिबिर घेण्यासाठी श्री.नंदाजी मडावी पोलीस पाटील, गौरय्या राऊत माजी सरपंच,श्री हणमंतु राऊत प्रतिष्टित नागरिक यांनी सहकार्य केले या शिबिरात संन्ड्रा येथील तेरा रुग्णांनी उपचार घेतले.
या प्रसंगी श्री केशव चव्हाण तालुका संघटक, श्री मारोती कोलावार तालुका प्रेरक अहेरी/भामरागड, साईनाथ मोहूर्ले समुपदेशक, कु.पूजा येलूरकर संयोजिका उपस्थित होते.