गोवारी समाजाच्या पाठीशी मी नेहमी उभा राहणार आमदार डॉ परिणय फुके यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

207

 

संजय टेंभुर्णे कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत
राज्यात लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या सुचिमध्ये गोंड-गोवारी जमातीचा समावेश आहे. परंतु त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. त्याकरिता गोवारी समाजाने अनेक आंदोलने केली. १९९४ च्या तीव्र आंदोलनाची दखल सुद्धा त्यावेळच्या राज्य शासनाने न घेतल्यामुळे गोवारी समाजातील संघटनांनी न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अखेर उच्च न्यायालायने गोवारीच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला. सरकारने अध्यादेश काढावा म्हणून आमदार डॉ परिणय फुके यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा केला परंतु अध्यादेश काढण्याचा निर्णय होत असतांनाच सरकार बदलल्यामुळे व महाविकास आघाडीच्या नव्या सरकारने गोवारी समाजाच्या आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे गोवारी समाजामध्ये सरकार विरोधात रोष निर्माण झालेला आहे. गोवारी समाजाला न्याय मिळावा म्हणून आज गोवारी समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार डॉ परिणय फुके यांची दिनांक २४ जुलै २०२० रोजी भेट घेवून निवेदन दिले व गोवारी समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल अवगत केले.
यावेळी आमदार डॉ परिणय फुके यांनी गोवारी समाजाच्या पाठीशी न्याय मिळे पर्यंत सोबत राहील असे आश्वासन दिले.

याप्रसंगी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र अध्यक्ष श्री कैलास राऊत, श्री हेमराज नेवारे, श्री जयदेव राऊत, श्री संजय हांडे, श्री योगेश नेवारे, निखिल राऊत, श्री सुरेश कोहळे, श्री राजेश शेंदरे, श्री रामेश्वर मोगरे व इतर मान्यवर उपस्थित होते.