मारेगाव तालुक्यात अखेर कोरोनाचा शिरकाव

1367

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मारेगाव तालुक्यातील 11 व्यक्ती पैकी एकाचा रिपोर्ट पोसिटीव्ह

मारेगाव :
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ११ जनांना मारेगाव तालुक्यातील पुरके आश्रम शाळेत हलविण्यात आलेल्या ” त्या ” संशयितापैकी एकाचा रिपोर्ट पोसिटीव्ह आल्यामुळे तालुक्यातील जनतेला चांगलाच झटका बसला.
वणी तालुक्यातील राजुर येथे मंगळवारी एक कोरोनाचा पोसिटीव्ह रुग्ण आढळल्याने मारेगाव तालुक्यातील संपर्कात आलेल्या 11 व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. यातील कुंभा येथील तिघे तर नेत येथील आठ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना मारेगाव येथील कोविड सेंटरमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते आज यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालयकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एका व्यक्तीचा अहवाल पोसिटीव्ह आल्याने मारेगाव मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला.