पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे संकल्पनेतुन “नक्षल दमन विरोधी सप्ताह” निमीत्त सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा अंतर्गत ग्राम धनेगाव येथे कृषी मेळाव्याचे आयोजन …

133

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी दखल न्यूज भारत..
आमगांव.. गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे ,अपर पोलीस अधीक्षक
अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन दमन विरोधी सप्ताह” राबविण्यात येत असुन आमगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जलिदंर नालकुल, पोलीस स्टेशन सालेकसाचे ठाणेदार डुणगे यांचे मार्गदर्शनाखाली स.दु. दर्रेकसा अंतर्गत मौजा धनेगाव येथे नक्षल दृष्ट्या दुर्गम भागातील बांधवांना शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमा दरम्यान ,मौजा धनेगाव येथिल ग्रामवासियांना भात शेती बाबत मार्गदर्शन करुन आधुनिक प्रकारची शेती करावी व त्याव्दारे जास्तीत जास्त उत्पन कसे वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.तसेच शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून कुकुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय इ. बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले .
तसेच आपल्या क्षेत्रामध्ये फुलशेती ला खुप मागणी आहे. आपण चांगल्याप्रकारे फुलशेती जसे की गुलाब, झेंडु, मोगरा, निशिगंधा इ.ची आधुनिक प्रकारे शेती/व्यवसाय म्हणुन लागवड केल्यास नक्कीच फायदा होईल, याबाबत उत्सुकता व सकारात्मकताही दिसुन आली.
सदर कार्यक्रम स.दु.क्षेत्र दर्रेकसाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सामलवार ,पोलीस उपनिरीक्षक .सुदर्शन इंगोले व .सतिश नवले सह स.दु.क्षेत्र दर्रेकसाचे सर्व कर्मचारी यांचे परिश्रमाने यशस्वीरीत्या पार पाडले…