शरद पवार यांना “जय श्रीराम” लिहिलेली १००० पोस्टकार्ड श्रीराम नवमी उत्सव समिती ,वणी तर्फे पाठवणार

0
197

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केलेल्या राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही या आक्षेपार्ह विधानानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती ,वणी तर्फे रस्त्यावर उतरून निषेध केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांना “जय श्रीराम” लिहिलेली तब्बल 1 हजार पोस्टकार्ड पाठविण्यात येणार, अशी माहिती श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी दिली.
तुम्ही कोणत्याही पक्षाचे सदस्य असा, कोणत्याही पक्षाचे अथवा संघटनेचे समर्थक असाल तरी पवारांचा वागण्याचा निषेध करायचा स्वाभिमान दाखवायला हवा असे आवाहन प्रणव पिंपळे व आशिष डंभारे यांनी केले. यावेळी कवशिक खेरा,पवन खंडाळकर,निखिल झाट्टे,अक्षय बोकडे, निखिल एकरे,रुपेश गायधने,अमर कुंकुंतलावर व तरुण उपस्थित होते.