धोक्याची घंटा ! देवरीत कोरोनाचे नव्याने दोन रुग्ण सापडले

310

उपजिल्हा प्रतिनिधी रुपेश कुमार टेंभुर्णिकर दखल न्युज गोंदिया

 

देवरी; गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. कोरोना संकटावर मात करण्यावर गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्याने चांगली कामगिरी केली होती. आजपर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेला देवरी तालुका कोरोनामुक्त म्हणुन वाटचाल करत असताना दोन कोरोनाचे रूग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता तालुक्यात दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. स्थानिक देवरी (वार्ड न.८) आणि धोबिसराड(आकरेटोली) येथे हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने दोन रुग्ण सापडल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड यांनी दिली आहे.

देवरीमध्ये आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण नागपुर येथे जाऊन आल्याची माहिती आहे. तर धोबिसराड येथे सापडलेला रुग्ण हा नागपुरातून आल्याची माहिती आहे. दरम्यान, जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या सर्व लोकांची तपासणी करून स्वाब घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे.*वार्ड क्र.८ व आकरटोली परिसर कटेंनमेंट झोन प्रशासनाने घोषित केले आहे.