Home कोरोना  घुग्घुस परिसरात चार कोरोना पॉजिटिव रुग्ण मिळाल्याने इंदिरा नगर व रामनगर चा...

घुग्घुस परिसरात चार कोरोना पॉजिटिव रुग्ण मिळाल्याने इंदिरा नगर व रामनगर चा काही परिसर सील

1388

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस परिसरामध्ये मागील दोन दिवसांमध्ये चार कोरोना पॉजिटिव रुग्ण मिळून आल्याने जिल्हा प्रशासनाने दिनांक 25 जुलै रोजी पासून इंदिरानगर तसेच रामनगर येथील परिसर सील केलेल्या आहे. दिनांक 24 जुलै रोजी इंदिरानगर येथे नागपूर हुन आलेल्या दोन रुग्णांना कोरोना पॉझिटिव घोषित करण्यात आले तसेच रामनगर येथील दोन व्यक्ती रॅपिड एंटीजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने इंदिरा नगर व रामनगर चा काही परिसर सील करण्यात आल्याचे समजते. चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड यांनी स्वतः उपस्थित राहून हा एरीया सील करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया पार पाडत असताना चंद्रपुर भाजपा चे जिल्हाअध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपुर पंचायत समिति उपसभापति निरीक्षण टान्द्रा , घुग्घुस चे प्रभारी सरपंच संतोष नुंने , भाजपा शहर अध्यक्ष विवेक बोढे , विनोद चौधरी यांनी मोलाची मदत केली.पुढील चौदा दिवस हा एरिया संपूर्णपणे सील असणार आहे .कोणीही नागरिक या परिसरातून बाहेर जाणे किंवा या परिसरात बाहेरून येणे यावर पूर्णपणे प्रतिबंध लावून त्या ठिकाणी पोलिसांचा कड़क बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे जेणेकरून परिसरात वाढत असलेल्या कोरोणा रुग्णांचा आकडा हाताबाहेर जाऊ नये .
तसेच ग्रामपंचायत ने सुद्धा त्वरित निर्णय घेऊन संपूर्ण घुग्घुस शहरातील मार्केट 26 जुलै व 27 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घुग्घुस चे प्रभारी सरपंच संतोष नुंने यांनी कमिटीची बैठक घेऊन हा निर्णय गावाच्या भल्यासाठी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
मागील काही दिवसापासून परिसरात पार्टी, समारंभ ,राजकीय पक्षाची आंदोलने यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती व प्रशासनाने जाहिर केलेल्या गाइडलाइन पायदळी तुडवन्यात धन्यता मानन्यात येत होती व त्यावर प्रशासनाचा कोणताच वचक असल्याचे दिसून येत नव्हते. आता मात्र परिसरातल्या लोकांना या संबंधाने विचार करणे आवश्यक झाले असून जनतेने सजग होने जरूरी झाले आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. कवी. प्रल्हाद गोविंदराव मेश्राम नाट्य निर्माता,दिग्दर्शक,संगीतकार व लेखक यांची नियुक्ती
Next articleधोक्याची घंटा ! देवरीत कोरोनाचे नव्याने दोन रुग्ण सापडले