श्री मंगेश शिंदे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे संकल्पनेतुन सशस्त्र दुरक्षेत्र पिपरीया हददीतील युवकांना रोजगार, खेळ, शिक्षण याबाबत मार्गदर्शन… जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात..

0
73

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..।।
आमगांव.. पोलीस अधिक्षक गोंदिया मंगेश शिंदे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतून दि.20/07/2020 ते 27/07/2020 पर्यत “नक्षल दमनविरोधी सप्ताह” राबविण्यात येत असून दिनांक 24/07/2020 रोजी आमगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल आमगाव, सालेकसा ठाणेदार राजकुमार डुणगे यांचे मार्गदर्शनखाली सशस्त्र दुरक्षेत्र पिपरिया येथे नक्षलदृष्टया दुर्गम भागातिल बेरोजगार युवक शालेय व महाविद्यालयीन युवकांना रोजगार खेळ शिक्षण स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करण्यात आले .
सशस्त्र दुरक्षेत्र पिपरियाचे प्रभारी अधिकारी घोडके सा. परिपोउपनि मुंडे सा. यांनी मुला-मुलींना रोजगार संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व खेळाविषयी तसेच आगामी काळात होणा-या पोलिस भरती संदर्भात मार्गदर्शन केले. मार्गदर्शन दरम्यान प्रभारी अधिकारी सा. यांनी नक्षल भागातील युवक- युवतींना नक्षल विचारसरनी विषयी माहीती देवुन नक्षलांचा कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य शिक्षण घेउन नौकरी तसेच उदयोगासाठी प्रयत्न करावे याबाबत सांगुन युवकांना व आदिवासी बांधवाचा स्वत:चा विकास साधण्याचे आव्हान करण्यात आले.
सदर कार्यक्रम सशस्त्र दुरक्षेत्र पिपरियाचे प्रभारी अधिकारी घोडके, परिपोउपनि मुंडे व स. दु. पिपरियाचे कर्मचारी यांचे सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले.