नागपुरात जनता कर्फ्यू यशस्वी; नागपुरकरांनी दिला जनता कर्फ्यू ला उदंड प्रतिसाद

0
406

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर: २५ जुलै २०२०
नागपुर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे व महापौर संदीप जोशी यांनी नागपुरकरांना कोरोना पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी आज पुकारलेल्या जनता कर्फ्यू ला नागपुरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
कोरोना पेशंट ची वाढती संख्या बघता जनतेला या विषयी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे कोणीही घराबाहेर फिरु नका आणि कोरोना ची साखळी तोडा असे आवाहन करताच नागपुरातील जनतेने ही आजच्या लाँक डाऊन ला यशस्वी केले. नागपुरातील गजबजलेले सिताबर्डी, लोकमत चौक,सदर शंकर नगर, रेशिमबाग रोड, इंदोरा चौक, कमाल चौक, जरीपटका, WHC रोड, CA रोड, लक्ष्मीभुवन चौक, रेशिमबाग, इमामवाडा, अग्रसेन चौक, इतवारी, महाल, अंबाझरी रामनगर. रवी नगर चौक, तसेच कोराडी रोड या भागात जनतेचा रस्त्यावर अगदी शुकशुकाट दिसला. प्रत्येक जण आपापल्या घरी राहुन जनता कर्फ्यू ला यशस्वी करतांना दिसले. फार क्वचितच लोक तुरळक प्रमाणात रस्त्यावर आलेत त्यांना समज देऊन मनपा आयुक्त तुकाराम मुंडे, महापौर संदीप जोशी, सहायक पोलीस आयुक्त भरणे, तसेच वाहतुक पोलिसांनी त्यांची चौकशी केली व त्यांना कोरोना संकटात बाहेर पुन्हा न फिरण्याची विनंती ही केली.
आज २५ जुलै रोजी पुकारलेला जनता जसा यशस्वी केला तसाच उद्याही जनता कर्फ्यू यशस्वी करा जेणेकरून पुढे नागपुर शहरात लाँक डाऊन वाढवायचा की नाही यांवर निर्णय घेतला जाईल असेल मनपा आयुक्त तुकाराम मुंडे व महापौर संदीप जोशी यांनी जनतेला आवाहन केले आहे.