कु. संस्कृती चितलांगे, राघव बाहेती, नेतल बंग यांचा सत्कार संपन्न.

 

मंगरूळपीर- 12 वी मधुन आपआपल्या शाखेतून प्रावीण्य प्राप्त केलेले कु. संस्कृती पुरूषोत्तम चितलांगे, राघव गिरीष बाहेती, कु. नेतल प्रशांत बंग यांचा स्थानिक चारभुजा मंदिरामध्ये दि. 25 रोजी स्व. श्री शंकरलालजी बजाज स्मृती गौरव पुरस्काराने शाल / श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आली तसेच स्थानिक बुलढाणा अर्बन बँकेच्या वतीने कु. संस्कृती चितलांगे व प्रतीक्षा बद्रीनारायन गाडे हिचा बँक मॅनेजर सुहास जाणे व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नंदकिशोर बियाणी साहेब यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन नरेंद्र शंकरलाल बजाज यांनी केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206