प्रजासत्ता दिनानिमित्त नावली येथे तंबाखूमुक्त कार्यशाळा शपथ विधी ग्रहण

0
128

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम :- जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम नावली येथे 26जानेवारी 71 व्या प्रजासत्ताक दिना निमित जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नावली ता रिसोड जिल्हा वाशिम येथे, सलाम मुंबई फाउंडेशन अंतर्गत विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ यांचा संयुक्त विद्यमाने मी माझे गाव, माझे घर, माझी शाळा, माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करेन, अशी मुलांकडून तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली, मुख्याध्यापक श्री रामा हुले सर यांनी विध्यार्थ्यांना तंबाखूने मानवी आरोग्य धोक्यात येत आहेत असे सांगितले शिक्षक श्री नारायण गारडे सर यांनी तंबाखूने कोणते आजार होतात याविषयी मार्गदर्शन केले, विवेकानंद युवा बहू. मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक श्री कोमल अ. आकाळ यांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास काय शिक्षा होणार या विषयी माहिती व मार्गदर्शन केले रिसोड तालुका समन्वयक गोपाल बाजड, व इतर शिक्षकवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत