विविध मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी रवळनाथ गाव विकास पॅनलने केले उपोषण. MIDC अधिकाऱ्यांकडून पंधरा दिवसांत तोडगा काढण्याचे पत्राद्वारे आश्वासन.

0
48

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी गावातून भली मोठी पाईप लाईन टाकून MIDC कडून जिंदाल कंपनीला पाणीपुरवठा केला जातो.ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली जातात त्या शेतकऱ्यांना MIDC किंवा जिंदाल काहीच मोबदला देत नाही. ज्या गावातून हा पाणीपुरवठा केला जातो ते गाव अध्याप पाण्यापासून वंचित राहिले आहे. उन्हाळी टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याची गावावर वेळ येते. तसेच जमिनीतून अनधिकृत पणे रस्ता करून घुसखोरी करण्यात आली आहे.ही घुसखोरी मागे घ्यावी. नळपाणी योजनेद्वारे गावचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न सोडवावा. अशा विविध समस्येविषयी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील यश मिळत नव्हते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या न्यायहक्कांसाठी आज रवळनाथ गाव विकास पॅनल निवळीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उपोषण करण्यात आले.या उपोषण ठिकाणी MIDC चे अधिकारी बी एन पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या पंधरा दिवसांत याविषयी तोडगा काढण्यात येईल असे पत्राद्वारे आश्वासन दिले. त्यानंतर पाणी प्राशन करून उपोषण सोडण्यात आले. जर पंधरा दिवसांत यावर निर्णय झाला नाही तर पुढे आमरण उपोषण करण्यात येईल असे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.या उपोषणाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष(दक्षिण) अँड दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका उपाध्यक्ष अशोक वाडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय सालीम, जिल्हा सहप्रवक्ते नित्यानंद दळवी, रमाकांत आयरे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

*दखल न्यूज भारत*