Home गोंदिया पोलीस अधीक्षक गोंदिया श्री मंगेश शिंदे, यांचे संकल्पनेतुन “नक्षल दमन विरोधी सप्ताह”...

पोलीस अधीक्षक गोंदिया श्री मंगेश शिंदे, यांचे संकल्पनेतुन “नक्षल दमन विरोधी सप्ताह” निमीत्त सशस्त्र दूरक्षेत्र बोंडे अंतर्गत ग्राम पळसगाव येथे कृषी मेळाव्याचे आयोजन

148

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज

पळसगाव : मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया (कॅम्प देवरी ) श्री अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री प्रशांत ढोले आणि ठाणेदार अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होत असलेल्या “नक्षल दमन विरोधी सप्ताहाच्या” निमीत्ताने सशस्त्र दुरक्षेत्र बोंडे हददीतील संवेदनशील नक्षलग्रस्त भाग असलेल्या पळसगाव येथे दि. 24/07/2020 रोजी भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन नवेगावबांध येथील प्राध्यापक श्री आर. एफ. राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पळसगावचे ग्रामसेवक श्री ए. आर. सानप गावचे पोलीस पाटील श्री गोपाल कुरसुंगे तसेच सशस्त्र दुरक्षेत्र बोंडे चे प्रभारी अधिकारी पोउपनि अशफाक शेख, पोउपनि रंजीत मटटामी व बोंडे येथील स्टॉफ तसेच पळसगावचे सर्व गावकरी उपस्थित होते.
या कृषी मेळाव्या दरम्यान श्री आर. एफ. राऊत यांनी गावक-यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल तसेच पिंकांवर लागणा-या रोगांविषयी माहीती दिली. तसेच पळसगावचे ग्रामसेवक श्री ए. आर. सानप यांनी गावक-यांना शासनाच्या विविध योजनाबाबत माहीती देवुन करोना विषाणु याबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन शेतक-यांना भात शेतीसाठी उपयोगी किटननाशक व खतांचे वाटप करण्यात आले तसेच शेतात लावण्यासाठी विविध फळझाडांचे वाटप करण्यात आले.
तसेच कृषी मेळावा निमीत्ताने जमा झालेल्या गावातील नवयुवक – युवतींना पोउपनि अशफाक शेख, पोउपनि रंजीत मटटामी यांनी स्पर्धापरीक्षा तसेच भरतीपुर्व प्रशिक्षणाबाबत माहीती देवुन गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजीत विविध प्प्रशिक्षण व रोजगार विषयक कार्यक्रमाची माहीती दिली.

Previous articleयुरिया विविध खतांचा तुटवडा होणार दूर आ.रणधीर सावरकर
Next articleकु. संस्कृती चितलांगे, राघव बाहेती, नेतल बंग यांचा सत्कार संपन्न.