प्रजासत्ताक दिना निमित्य महापुरुषांना केले अभिवादन

89

 

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व महापुरुषांना अभिवादन करीत गणतंत्र दिवस थाटात साजरा करण्यात आला .
मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेवर , लाल बहादुर शास्त्रींच्या प्रतिमेवर , सरदार वल्लभ भाई पटेल यांचा प्रतिमेवर , व महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , यांनी प्रजासत्ताक दिना निमित्य मार्गदर्शन करुन महापुरुषांना अभिवादन केले . त्यानंतर कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना डायरी व पेन देऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकारी यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत प्रजासत्ताक दिवस थाटात संपन्न करण्यात आला .
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , सहसचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सुप्रित बावने , , मंच महिला सदस्य सुषमा मस्के , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , सचिन यादव , प्रवीण माने , सोनु खोब्रागडे , सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच सदस्य प्रवीण माने यांनी केले तर आभार मंच सदस्य प्रकाश कुर्वे यांनी व्यक्त केले .