१फरवरी ला होणार ग्राम पंचायत सरपंच पदाची सोडत,२९जनवरी ला प्रसिद्ध होणार अधिसुचना

324

 

पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

पाराशेवनी(ता प्र) पारशिवनी तालुकाची दहा ग्राम चे गाव सदस्य कारभारी निवडल्या गेलेत, सरपंच पदी कुणाची वर्णी लागणार हे निश्‍चित झालेले नाही. आता सरपंच पदासाठी येत्या १ फेब्रुवारी रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. तालुका तील १० ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून यात नुकत्यात झालेल्या १० ग्रामपंचायतींचासुद्धा समावेश आहे. हे आरक्षण वर्ष २0२0 ते २0२५ पर्यंतसाठी राहणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्यात निवडणुकीपूर्वीच अनेक ठिकाणच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. परंतु ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व आरक्षण रद्द करीत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरही बरीच टीका झाली. सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर परिणामाची माहिती विभागाकडून घेण्यात आली. अनुसूचित जमातीचा सदस्य नसताना सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीचे निघाल्यास मोठी अडचण होणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे निघाले आणि बहुमत असलेल्या गटाकडे त्याचे प्रतिनिधीत्व नसल्यास मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.सरपंच निवडणूक निकालीचा अधिसूचना २९ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. आणी पाराशेवनी तालुना सरपंच पदाची आरक्षण सोडत तल्लुका निवङणुक अधिकारी ,तहासिलदार वरूण कुमार खहारे यांची अध्यक्षेत तर नायब तहिसलदार निवडणुक राजन्द सयाम,कैलाश अल्लेवार व निर्णय अधिकारी मनोज साहारे,विजय नाईक,विलास लठठाड यांची उपस्थित संख्या सोडत होणार ,अशी माहीती तालुका निवडणुकअधिकारी ,तहसिलदार वरूण कुमार सहारे यांनी दिली.