सिंदेवाहीत शासकीय ध्वजारोहण परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, सुश्री पर्वणी पाटील ह्यांचे शुभहस्ते संपन्न

212

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत टि. पोपटे,
उपसंपादक-९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत

सिंदेवाही येथे तहसिल कार्यालयाचे प्रांगणात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सिंदेवाहीच्या तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी सुश्री पर्वणी हर्षा रविंद्र पाटील ह्यांचे हस्ते़ सकाळी ९-१५ वाजता संपन्न झाला. मुख्य व शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला शहरातील गणमान्य व्यक्ती, उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर सिंदेवाही पोलिसांतर्फे तहसिलदार यांना मानवंदना देण्यात आली. पोलिस व ग्रुहरक्षक दल यांनी पथसंचलन केले, सर्वोदय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी राष्ट्रगित गाऊन राष्ट्रगान केले. शेवटी तहसिलदार यांचे दालनात उपस्थित मान्यवरांचा तहसिलदार यांनी परिचय करूण घेत, १४ ऑक्टोबर ते आजपर्यंत आपणाकडून चांगले सहकार्य लाभले त्याबद्दल क्रुतज्ञता व्रक्त केली. उपस्थित मान्यवरांना जलपान व च्याहा वितरीत करूण कार्यक्रम गोड करण्यात आला. कार्यक्रमाला आवार्जुन सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेविका, पं.स. सभापती, उपसभापती, माजी सभापती, वनपरिक्षेत्राधिकारी, ठाणेदार, पी. एस. आय. तसेच कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होती.