पादुका संस्थान मुंडगाव येथे रक्त तपासणी शिबीर

0
81

 

अकोट ता. प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे यात्रा सप्ताहात विश्वस्त मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले.
त्याच अनुषंगाने आज दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, मुंडगाव च्या वतीने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये sugar thyroid kft lft cbc ची तपासण्या करण्यात आल्या .
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा भिरडे, व डॉ. स्नेहा कोठे तसेच मिलींद सरकटे clw, प्लेबोटोमीस्ट मनिषा वानरे, सिमा भटुरकर, पुनम वानखडे, छगन अंबळकार यांनी सेवा दिली. संस्थानचे वतीने डॉ स्नेहा कोठे यांचा शाल देवुन सत्कार करण्यात आला.